Tuesday, June 29, 2010

मुळ संकल्पना(कॉंसेप्ट नोट)

नविन अध्यात्मिक केंद्र आणि तरुण

मुंबई मेट्रो सिटी म्हणून जगातल्या कित्येकांना ओळखीची आहे. इथल्या अर्थव्यवस्था आणि बिझनेस स्ट्रॅटेजीमुळे तर मुंबईला हायक्लास सिटीचा दर्जा मिळाला आहे. मुंबईत रहाणा-या प्रत्येकाचे जीवन अत्यंत धकाधकीचे आणि धावपळीचे आहे. अर्थात मुंबई भारताची आर्थिक राजधानी असल्याने इथे प्रत्येकाला सेकंदागणिक पैशांचा हिशेब मांडावा लागतो. या अशा लाईफ स्टाईलमुळे हँग झालेल्या मुंबईकरांना रिफ्रेश आणि रिस्टार्ट होण्यासाठी इथे स्पा, पब, रेस्टॉरंट, मॉल, योगा क्लासेस, जीम, मेडीटेशन सेंटर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याच बरोबर मुंबईकरांसाठी सत्संग हा एक वेगळा पर्यायही लोकप्रिय होत आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून स्वामी, बापू, महाराज, माताजी असे कित्येक अध्यात्मिक गुरू मुंबईत फार मोठ्या प्रमाणात प्रवचन आणि सत्संग यांचे आयोजन करताहेत, आणि त्यांना मुंबईकरांचा तेवढाच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुकारच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आणि संशोधन करत आहोत. गेल्यावेळेस केलेल्या “मुंबईतील प्रार्थना स्थळे आणि तेथे बोलले जाणारे नवस” या विषयावरील संशोधनातून मिळालेल्या काही इंटरेस्टींग माहितीमुळे ह्या विषयावर अँडव्हान्स रिसर्च करायचा विचार मनात आला, आणि म्हणून यासाठी अर्ज केला. विषय थोडासा वेगळा असल्याने आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. प्रथम कामाला सुरूवात केल्यावर बरेचसे अँगल समोर आले. त्यापैकी ‘मेडीटेशन’ ह्या अँगलवर संशोधन करण्याचे ठरले.
पण काही दिवसांच्या अभ्यासानंतर तसेच राहुल आणि मतियाझ या दोघांसोबत झालेल्या चर्चेनंतर मग मुंबईतील नविन अध्यात्मिक स्थळांचा जी-मँप व्दारे मँपिंग करण्याचे ठरवले. जी-मँप हा आमच्यासाठी नवा प्रकार होता. पण आमच्या प्रॉजेक्टला रिप्रेजेंट करण्यासाठी हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरेल म्हणून आम्ही जी-मॅपिंगला सुरूवात केली. मुंबईतील नविन अध्यात्मिक स्थळांचा शोध घेऊन त्यांना मॅपवर अँड केले. त्याचबरोबर ब्लाँग, फ्लिकर अशा जास्तित जास्त अँक्सेसिबल साईटचा उपयोग करून आमचा विषय ब-याच लोकांपर्यत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आमच्या या वर्षभराच्या संशोधनातून अत्यंत महत्त्वपुर्ण माहिती आमच्यासमोर आली.

By
Santosh Takale