Tuesday, June 29, 2010

माहिती गोळा करण्याची प्रक्रिया एक आव्हान

अँडव्हांस रिसर्च म्हणून सुरू झालेल्या आमच्या संशोधन प्रकल्पाला तब्बल एक वर्ष पुर्ण झाले. संपुर्ण वर्षभरात आम्ही मुंबईतल्या नविन अध्यात्मिक स्थळांचा अभ्यास केला आणि त्याचे दस्तऐवजीकरण म्हणजेच डॉक्युमेंटेशन केले. मुंबईत गेल्या १५ ते २० वर्षात आर्ट आँफ लिव्हींग, ब्रम्हकुमारी, अनिरूध्द बापू, सत्यसाई बाबा, अम्मा अश्या कित्येक धर्मगुरूंच्या आश्रम आणि संत्सग केंद्रांची सुरूवात झाली आहे, आणि त्याला मुंबईकरांचा भरघोस प्रतिसादही मिळत आहे. इथे येणारे मुंबईकर वेगवेगळ्या स्तरातील तसेच वयोगटातील आहेत. अगदी १३ ते ९६ वर्षांपर्यंतच्या अनुयायांची नोंद इथल्या सत्संग केंद्रात पहायला मिळते. झपाट्याने वाढत असलेल्या या नविन धार्मिक किंवा अध्यात्मिक केंद्रांचे दस्तऐवजीकरण म्हणजेच डॉक्युमेंटेशन करणे तसे फार कठीण होते कारण सध्या प्रसार माध्यमांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अश्या ठिकाणी माहिती गोळा करणे किंवा तिथल्या अनुयायांसोबत बोलणे याला परवानगी मिळत नव्हती. त्याचमुळे आम्हाला माहिती मिळवणे कठीण गेले. पण काहींनी आम्हाला चांगला प्रतीसाद दिला, त्यामुळेच आज आमचा संशोधन प्रकल्प पुर्ण होऊ शकला.
आम्ही तयार केलेल्या प्रश्नावलीत एकूण १० प्रश्न होते. फक्त व्हिजीट करून किंवा व्हिडीओ शुटींग करून भागणार नव्हते, शिवाय आम्हाला या सेंटरमध्ये शुटींग किंवा फोटोग्राफी करण्यासाठी परवानगी मिळाली नसल्याने शेवटी आम्ही वन टू वन इंटरअँक्शनच्या मेथडने तब्बल १०० मुलाखती घेतल्या. मुंबईतल्या १५ केंद्रांवर या मुलाखती झाल्या. त्यातून मिळालेली माहिती विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

मुलाखतीमधुन काय मिळाले?
विषयाबद्दल माहिती मिळावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांचे म्हणणे आमच्यापर्यंत पोहचावे या उद्देशातून प्रश्नावली तयार करण्यात आली होती. एकूण १० प्रश्नांची ऊत्तरे यामधुन उपलब्ध झाली आहेत. ही प्रश्नावली ऑप्शनल होती. योग्य पर्याया समोर बरोबर खुण करुन आपलं मत मांडता येणार होते. मिळालेल्या ऊत्तरांची सरासरी काढून १०० पैकी टक्केवारी ठरवण्यात आली आहे. त्याचनुसार मुलाखतदारांची मते टक्केवारीत मांडली गेली आहेत.
उदा.
तुम्हाला या संस्थेबद्दल माहिती कशी मिळाली? या प्रश्नाला पर्याय होते
१) बातम्यांव्दारे ४) मित्र आणि नातेवाईक
२) इंटरनेट ५) इतर
३) जाहिरात


१०० प्रश्नावलीतील ऊत्तरांच्या सरासरीनुसार मिळालेल्या ऊत्तरांची टक्केवारी होती.
न्युज – २२% इंटरनेट – २३% जाहिरात -३७%
मित्र आणि नातेवाईक -१०% इतर – ८%
प्रश्नावलीमधून मिळालेली माहिती सविस्तरपणे सांगायची झाल्यास प्रत्येक प्रश्नाबद्दल लिहायला हवे.

१) आपण या नविन धार्मिक किंवा अध्यात्मिक केंद्रात का आलात?
या प्रश्नाला ऊत्तरे मिळाली

मेडीटेशनसाठी – ३०%
मुंबईतली ही नविन धार्मिक किंवा अध्यात्मिक स्थळे मुंबईकरांची मेडीटेशन सेंटर बनली आहेत असे म्हणायला हरकत नाही. सध्या मुंबईकरांच्या धावपळीच्या आणि ताणयुक्त जीवनशैलीमुळे या मंडळींना ध्यान धारणेची किंवा मेडीटेशनची नितांत गरज आहे. आणि ती गरज अशी केंद्र पूर्ण करत आहेत.
२) वयोगट
या सेंटरमध्ये येणा-यांची वयोमर्यादा तशी निर्धारीत करण्यात आली नाही तरीही आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार इथे १५ ते २९ वयोगटातले साधक जास्त प्रमाणात येतात. यांचे प्रमाण ४१% आहे तर त्याच्या खालोखाल ५० वर्ष आणि त्यापुढील वयेगटातल्या साधकांची टक्केवारी ३१% आहे.

३) लोकप्रिय अध्यात्मिक केंद्र
मुंबईत तसे सगळीच केंद्र लोकप्रिय आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणावर भरवले जाणारे सत्संग, बॅनर, न्युजपेपर, दुरदर्शन वाहीन्या इत्यादी माध्यमांतून होणारी जाहीरातबाजी यामुळे ही केंद्र सगळ्यांनाच परिचीत आहेत. पण तरीही आम्हाला मिळालेल्या प्रतिसादातून एकूण दोन केंद्र जास्त प्रमाणात लोकप्रिय आहेत. ती पुढील प्रमाणे आर्ट आँफ लिव्हींग आणि अम्मा. या केंद्रांना अनुक्रमे २८% आणि २७% मतांचा कल मिळाला.

४) केंद्रातील आकर्षण
मुंबईत जितकी आश्रमं आहेत तितकी सगळीच सुंदर आणि आकर्षक आहेत. विशेषतः अम्मा, आसारामजी बापू, आर्ट ऑफ लिव्हींग, चिन्मय मिशन अशी काही निवडक केंद्र तर नव्या अध्यात्मिक केंद्रांमध्ये आयडीयल म्हणावे लागेल. हि सगळी केंद्र शांतता, नयनरम्य वातावरण आणि मनाला एक नवी चेतना देणारी ठिकाणे म्हणावी लागतील. आम्ही तयार केलेल्या प्रश्नावलीत ही हा प्रश्न होता. आम्हाला मिळालेल्या ऊत्तरांमध्ये सर्वात जास्त लोकांचे म्हणणे आहे की “इथे शांतता मिळते. आणि तेच इथे येण्याचे खास आकर्षण आहे. शिवाय इथला परिसर आणि केंद्राची मांडणी इतकी सुबक आहे की दर अठवड्याला न चुकता येथे यावेसे वाटते. तसेच इथल्या सत्संगामधुन मिळणा-या पॉझिटीव्ह विचारांमुळे जीवन जगणे अधिक सुखकर होते.”

५) भविष्य़ात विक एण्डसाठी कुठे जाणे पसंत कराल?
प्रश्नावलीतला हा सर्वात शेवटचा आणि मजेदार प्रश्न होता. या प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अध्यात्मिक केंद्र या पर्यायापुढे बरोबरची खूण करुन आपली पसंती नोंदविणा-यांची टक्केवारी ४३% आहे. तर पिकनीक स्पॉटवर २२% लोकांनी पसंती दर्शवली आहे. कदाचित दिवसागणिक कामाचा ताण, वातावरण, माणसाची वृत्ती इत्यादीमध्ये बदल होतील आणि लोक खरंच अध्यात्मिक केंद्रांमध्ये गर्दी करतील.



जी मॅप बद्दल थोडेसे
आमच्या अभ्यास प्रकल्पासाठी गुगल मॅप बनवणे ही संकल्पना मुळात मतियाझने आमच्या पुढे मांडली. ही संकल्पना आमच्यासाठी अगदी नविन होती. हायटेक टेक्नॉलॉजीत एक्स्पर्ट अलेल्या मतियाझमुळे या वर्षिचा अभ्यास प्रकल्प ऑन लाईन बेस आहे. या टेक्नॉलॉजीचा उपयोग जास्तित जास्त टार्गेट ग्रुप पर्यंत पोहचण्यासाठी करतात, आणि म्हणूनच या संकल्पेचे स्वागत केले आणि कामाला लागलो.
जी मॅपवर मुंबईतील नविन अध्यात्मिक केंद्र लोकेट करणे आणि त्या प्रत्येक लोकेशन बद्दल सविस्तर माहिती देणे अश्या स्वरुपाचे काम जी मॅपव्दारे करण्यात आले. त्याचमुळे फक्त एका क्लीकवर आमचा रिसर्च आऊटपुट लोकांपर्यंत पोहचवता आला. सविस्तर मॅप खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.

http://maps.google.co.in/maps/ms?ie=UTF8&hl=en&msa=0&msid=117571050918607567860.00047bc3526d4c1f472af&z=11